[nashik] - ढाबा बंद करण्यावरून राडा

  |   Nashiknews

पोलिस निरीक्षकावर ग्राहकांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ढाबा रात्री १० वाजता बंद करण्याच्या कारणावरून शनिवारी रात्री राडा झाला. हॉटेल चालकाचा दोष असताना आम्हाला त्रास का असे म्हणत ग्राहकांनी पोलिसांना धारेवर धरले. तसेच पोलिस निरीक्षकाने मद्यपान केल्याचा गंभीर आरोप देखील ग्राहकांनी केला. नियमानुसार कारवाई होत असताना त्याला खोडा घालण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे इंदिरानगर पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्तांकडे चौकशी सोपविण्यात आली.

मतदानाच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी देशी दारूच्या विक्रीत १३० टक्के वाढ झाली. हाच धागा पकडून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हॉटेल्स व ढाब्यांच्या वेळेबाबत कठोर धोरण ठेवण्याचे आदेश दिले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास इंदिरनगर पोलिसांनी याबाबत कार्यवाही सुरू केली. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका ढाब्याजवळ पोलिस वाहन थांबले. तिथे हॉटेल बंद करण्याबाबत पोलिसांनी सूचना केल्यात. मात्र, या बदलेल्या वेळेबाबत माहिती नाही तसेच हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक असल्याचे ढाबाचालकाने सांगितले. नवीन ग्राहक न घेता तासाभरात हॉटेल बंद झाले पाहिजे, असे सांगत पोलिस तेथून निघून गेले. तासाभराच्या अंतराने पोलिस निरीक्षक अनिल पाटील व त्यांचे सहकारी पुन्हा आले असता ढाबा सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी आत घुसून ग्राहकांनाच बाहेर काढण्याची सुरुवात केली. यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांनी यास विरोध दर्शवला. उलट ग्राहकांनी पोलिसांनी मद्य प्राशन केले असल्याचा दावा केला. हा वाद वाढल्याने पोलिसांनी ढाबा चालकास ढाबा बंद करण्याच्या सूचना केली. मात्र, पन्नासहून अधिक ग्राहकांनी पोलिस वाहनालाच गराडा घातला. दहा मिनीटे हा गोंधळ सुरू असल्याने पीआय पाटील यांनी नियंत्रण कक्षास कॉल करून मदत मागितली. यावेळी पोलिस आयुक्त नांगरे पाटील इंदिरानगर पोलिस ठाण्यातच होते. त्यामुळे ते लागलीच घटनास्थळी पोहचले. इतर ठिकाणाहून बंदोबस्त तेथे पोहचला. या प्रकरणी पाटील यांच्या चौकशी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून, ही चौकशी डिव्हीजनचे सहायक पोलिस आयुक्त करीत आहेत. दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ग्राहकांमध्ये काही मद्यपी होते. त्यांनी हा प्रकार केला असून, उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी ढाबा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eBoksgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬