[nashik] - नाशिकमधून ७५१ मतदारांचे टपाली मतदान

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी सेवेतील नोकरदारांच्या टपाली मतदानास सुरुवात झाली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत ७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

नाशिकचे माजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही रविवारी मतदानाचा हक्क बजावला. सरकारी नोकरीत कार्यरत बराचसा कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामकाजात अडकून पडतो. परिणामी त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाचा पर्याय दिला जातो. निवडणुकीसाठीच्या प्रशिक्षण सत्रापासूनच कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोतील संभाजीराजे स्टेडियम, दादासाहेब गायकवाड सभागृह, विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याच ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

२३ मेपर्यंत मतदानाची संधी!...

फोटो - http://v.duta.us/Ibf3IAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NEckcgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬