[navi-mumbai] - ‘डिश टीव्ही’, ‘एअरटेल डिजिटल’ला तंबी

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्राहकांना विशिष्ट चॅनेल्सची सक्ती करणाऱ्या केबल सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर ताशेरे ओढल्यानंतर आता केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे मोर्चा वळवला आहे. डिश टीव्ही आणि एअरटेल डिजिटल टीव्ही (भारती टेलिमीडिया) या दोन कंपन्यांना ग्राहकांवर सक्ती न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून ही सक्ती सुरू राहिल्यास 'ट्राय'कडून कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

'ट्राय'च्या नव्या धोरणानुसार, यापुढे डीटीएच किंवा केबलधारकांना त्यांना हव्या त्या चॅनेल्सची निवड करता येणार आहेत. काही स्वतंत्र चॅनेल्स, चॅनेल्सची निर्माती कंपनीने त्यांचे चॅनेल्स एकत्र करून तयार केलेले बुके आणि डीटीएच किंवा केबल सर्व्हिस प्रोव्हायडर्सने तयार केलेली पॅकेजेस निवडण्याचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारचे चॅनेल्स किंवा बुके खरेदी करू शकतात. मात्र, गेल्या आठवड्यात काही केबल सर्व्हिस प्रोव्हायडर्स त्यांच्या फायद्यासाठी ग्राहकांवर विशिष्ट चॅनेल्स घेण्यासंदर्भात सक्ती करत असल्याच्या तक्रारी 'ट्राय'कडे दाखल झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना त्वरित सूचना देण्यात आल्या आहेत. याच प्रकरणात आता डिश टिव्ही आणि 'एअरटेल डिजिटल' या कंपन्यांबाबतीतही ग्राहकांच्या तक्रारी दाखल झाल्याने त्यांनाही 'ट्राय'ने त्वरित ग्राहकांवर सक्ती करू नयेत, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. वारंवार ही बाब उघडकीस आली तर या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही 'ट्राय'कडून सांगण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/05empgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬