[navi-mumbai] - निवडणुकीसाठी दक्षता

  |   Navi-Mumbainews

चार महिन्यांमध्ये ४१ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चार महिन्यांमध्ये आपल्या हद्दीतील एकूण ४१ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यासोबत बेकायदा व विनापरवाना देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवरही बडगा उगारला आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री विकणाऱ्यांवर व बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवरही जोरदार कारवाई करून अनेकांना अटक केली. या कारवायांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबच सार्वजनिक शांतता टिकून राहण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक-२०१९च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगार व शिक्षा झालेले गुन्हेगार यांच्याकडून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. परिमंडळ-१ परिसरातील २४ गुन्हेगारांवर तर परिमंडळ-२च्या हद्दीतील १७ अशा एकूण ४१ गुंडांवर नवी मुंबई पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GVl0LwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬