[navi-mumbai] - नवी मुंबईत पाणीकपात नाही

  |   Navi-Mumbainews

मोरबे धरणात सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असल्याने पालिकेला कधी पाण्याची टंचाई भासली नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांनाही कधी पाणीकपातीचा सामना करावा लागलेला नाही. सध्या मोरबे धरणात सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र असे असले तरी नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही ८८ मीटर आहे . या मीटर पातळीवर धरणात सरासरी १९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. मागील पावसाळ्यात धरणाने ही पातळी ओलांडली असल्याने शहराला आजपर्यंत मुबलक पाणीपुरवठा होत आहे. दररोज पाणीवाटपाचे योग्य नियोजन केले जात असल्याने पाणीकपातीचा सामना नवी मुंबई महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना करावा लागत नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RYhM3gAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬