[navi-mumbai] - बाजारात अंजीराची आवक

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून वर्षभर आपल्याला हवी ती फळे अगदी हंगाम नसला तरी मिळतात मात्र त्यातही काही फळे आहेत जी आपल्याला त्यांच्या हंगामातच खाता येतात. त्यापैकीच एक फळ म्हणजे अंजीर. सध्या अंजीराचा हंगाम असल्याने बाजारात बऱ्याच प्रमाणात अंजीर पाहायला मिळत आहेत. बाजारात सध्या ४० ते ५० क्विंटल अंजिराची आवक दररोज होत आहे. उन्हाळ्यात अंजिराची आवक बाजारात होते. त्यामुळे सध्या बाजारात अंजीर पाहायला मिळत आहेत. सध्या पुण्यातील फलटणमधून हे अंजीरचे बॉक्स बाजारात येत आहेत. चाळीस ते साठ रुपयांप्रमाणे हे बॉक्स घाऊक बाजारात विकले जात आहेत. स्ट्रॉबेरीप्रमाणे अंजीर हे नाजूक फळ असल्याने त्याचा व्यापारही मर्यादित होतो. मात्र त्याची चव आणि त्यात असलेले गुणधर्म पाहता ठराविक वर्गाकडून त्यांना मागणी आहे. पाऊस सुरू होईपर्यंत ही आवक अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lPDaSAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬