[navi-mumbai] - २१ गाळ्यांवर सुनावणी

  |   Navi-Mumbainews

न्यायालयाच्या आदेशाने महापालिका घेणार सुनावणी

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या देवाळे तलावाचे सुशोभिकरण पूर्ण झाले. मात्र तलावाला लागून असलेले २१ बेकायदा गाळ्यांचे मालक न्यायालयात गेल्यामुळे महापालिकेला या गाळ्यांवरील कारवाई थांबवावी लागली होती. न्यायालयाने या गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश महापालिकेला दिल्यामुळे ३० एप्रिल रोजी प्रभाग समिती कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहरातील देवाळे तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. महापालिकेने सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले आहेत. मुख्यलयाच्या इमारतीच्या समोरील रस्त्याला लागून असलेल्या देवाळे तलावाचे सौदर्य सुशोभिकरणानंतर वाढले. मात्र तलावाला लागून असलेल्या पीर करमअली बाबा शाह दर्ग्याच्या आवारात खासगी जागेत अनेक वर्षांपासून २१ व्यवसायिक गाळे आहेत. महापालिकेने सुशोभिकरण करण्यापुर्वीच गाळे हटविण्याची कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र वर्षभरापुर्वी सुरू केलेल्या तलावाचे काम पूर्णत्वाकडे आल्यानंतर उद्घाटनापूर्वी पनवेल महापालिकेला जाग आली. ऑक्टोबर २०१८मध्ये संबंधित गाळ्यांना नोटीस देऊन १५ दिवसांत जागेच्या मालकीविषयक पुरावे सादर करण्याची नोटीस प्रभाग अधिकारी कार्यालयाने दिली होती. मात्र या गाळेमालकांनी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे महापालिकेला कारवाई करता आली नाही. तलावाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाल्यानंतर तलावाला लागून असलेले गाळे सौदर्याला बाधा ठरत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kVjdvQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬