[pune] - पाच विभागांत बंदोबस्ताची विभागणी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मावळ व शिरूर या दोन मतदारसंघात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दोन मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघ हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत येतात. मतदानाच्या पूर्वसंध्येला ५ उपायुक्त, ११ सहायक आयुक्तांसह ३० निरीक्षक तसेच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरातील नियुक्तीस असणाऱ्या उपायुक्त व सहायक आयुक्तांव्यतिरिक्त दोन उपायुक्त व सहा सहायक आयुक्त अन्य पोलिस आयुक्तालयातून शहरात बंदोबस्तासाठी आले आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्य राखीव पोलिस दलाचे ५०० जवान, होमगार्ड बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले असून, प्रत्येक उपायुक्त व सहायक आयुक्तांबरोबर केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या जवनांची एक तुकडी गस्तीसाठी नेमून देण्यात आली आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार, कर्मचारी हे शहरात पूर्वसंध्येपासूनच बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/sHDV4wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬