[pune] - फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर महाग

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली असली तरी मागणीच्या तुलनेत पुरेशी नाही. त्यामुळे कांदा, बटाटा, लसूण, फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळाच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

मार्केट यार्डात गेल्या काही आठवड्यांपासून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. त्याचा फटका सामान्यांना फळभाज्या महाग मिळू लागल्या आहेत. मार्केट यार्डात रविवारी १४० ते १५० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून ४ ट्रक मटारची आवक झाली. बेंगळुरूतून १ टेम्पो आले, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ट्रक कोबी, कर्नाटकातून ५ टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाच्या पाच हजार गोण्यांची आवक झाली....

फोटो - http://v.duta.us/l2uupwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/h49dGgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬