[pune] - बीव्हीजी-डिक्कीघडवणार उद्योजक

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बीव्हीजी उद्योग समूह' व 'दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स'तर्फे (डिक्की) आगामी काळात शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती 'डिक्की'चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.

बीव्हीजी लाइफ सायन्सेसतर्फे आयोजित खरीप नियोजन शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी बीव्हीजी समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, हास्य क्लबचे मकरंद टिल्लू, विश्वशांती इंटरनॅशनल फाउंडेशनचे डॉ. दत्ता कोहिनकर, वसंत हणकारे, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.

'विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय विषमुक्त शेतमालास मोठी मागणी आहे. मात्र, त्याच वेळी रासायनिक शेतीत अतिरिक्त उत्पादनाचा अट्टाहास टाळून उत्पादित केलेल्या शेतमालास देशांतर्गत बाजारपेठ मिळवून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बीव्हीजी लाइफ सायन्सेस प्रयत्नशील आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या काळात बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने शेतकरी टिकवला आहे,' असे कांबळे म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kCBzkAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬