[pune] - ‘भरोसा सेल’मुळे सुटलाज्येष्ठ दाम्पत्याचा प्रश्न

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोघांनी अनेक वर्षे एकत्र संसार केला; पण त्यांच्यात पटेनासे झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून दोघे विभक्त झाले. या दाम्पत्याकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी असूनही त्यांना कसेबसे जगावे लागत होते. अखेर हे प्रकरण 'भरोसा सेल'च्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे आले. त्यांनी दोघांना बोलावून समुपदेशन केले. दोघांमध्ये सुसंवाद घडवून संपत्ती विकून पैसे वाटून घेण्याचा मार्ग काढला. दोघे समोरसमोर येत नसल्यामुळे काही वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. आता मात्र, दोघांना दिलासा मिळाला.

या ज्येष्ठ नागरिकाचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. तर, त्यांची पत्नी उत्पादन शुल्क विभागामधून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना एक मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे पटत नसल्यामुळे दोघेही विभक्त राहतात. पती एका मित्राकडे तर, पत्नी मुलीसोबत दुसरीकडे राहते. दोघेही आता काम करत नसल्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. या दाम्पत्याची समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधीची रुपयांची संपत्ती आहे. ती विक्री करण्यासाठी दोघांमध्ये सुसंवादाची आवश्यकता होती. पण, दोघे एकमेकांच्या समोर येत नसल्यामुळे संपत्तीचा विक्रीचा प्रश्न निकाली निघत नव्हता. त्यामुळे दोघांना ही रडत-खडत जीवन जगावे लागत होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lWcjrAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬