[pune] - राज्यात सूर्य मुक्कामी

  |   Punenews

पुण्यात गेल्या शंभर वर्षांतील एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सकाळपासूनच वाढलेले ऊन, रस्त्यावरून जाताना जाणवणाऱ्या उष्णतेच्या झळा आणि घरात असह्य उकाड्यामुळे लागलेल्या घामाच्या धारा यामुळे रविवारी पुणेकर हैराण झाले. गेल्या आठवड्यापासून एकेक पायरी वर चढणाऱ्या पाऱ्याने रविवारी ४३ अंश सेल्सिअसची पातळी गाठली. पुण्यातील एप्रिल महिन्यातील गेल्या शंभर वर्षांतील हे उच्चांकी तापमान आहे. दरम्यान, राज्यातही उष्म्याचा कहर कायम असून, सर्वाधिक कमाल तापमान परभणी आणि अकोल्यामध्ये ४७.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सलग चौथ्या दिवशी बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुण्यामध्ये रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमानात वाढ झाल्याने पुणेकर वैतागले. किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस इतके होते. दिवसभर वाढलेले तापमान हाच चर्चेचा विषय होता. सकाळपासूनच उकाडा जाणवायला सुरुवात झाली. सकाळी दहानंतर ऊन्हाचा चटका आणखी वाढला. रस्त्यावर फिरताना उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करत होत्या. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही लोकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळले. संध्याकाळनंतर लोक कामांसाठी बाहेर पडले; पण उकाडा कायम होता. गारवा मिळविण्यासाठी अनेकांनी शहरातील उद्याने आणि टेकड्या गाठल्या. रात्रीही आईस्क्रीम आणि थंड पेयांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली....

फोटो - http://v.duta.us/4K-OugAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/O8hv_QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬