[pune] - शिरूर मतदारसंघात दीड हजार पोलिस

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघासाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील ४४१ केंद्रावर मतदान होणार असून, येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील भारती विद्यापीठ, कोंढवा, हडपसर, मुंढवा, वानवडी आणि बिबवेवाडी अशा सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यापैकी हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मतदान केंद्रे असून. त्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २३ तारखेच्या बंदोबस्ताप्रमाणेच गस्तीसाठी पाच पथके राहणार आहेत. त्याचबरोबरच तपासणी नाकेही सुरू करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र ११२ कर्मचारी देण्यात आले आहेत. या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेले २० मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून, त्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील मतदान झाल्यामुळे काही मनुष्यबळ पिंपरी पोलिस आयुक्तालयास देण्यात आले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3RC6qQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬