[sangli] - मिरज-म्हैसाळ रस्त्यावर विचित्र अपघातात आठ जखमी

  |   Sanglinews

म्हैसाळ/मिरज : शहर प्रतिनिधी

मिरज-म्हैसाळ रस्त्यावर रविवारी सायंकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये आठजण जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिरज - म्हैसाळ रस्त्यावर विजयनगर जवळ असणार्‍या तपोवन जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. टेम्पो (क्र. एमएच 09 ईएम 3063) दूध घेऊन मिरजेतून म्हैसाळ कडे निघाली होती. त्याचवेळी कार (क्र. एमएच 09 ईयू 5520) व कार (क्र. एम. एच. 10 ए. एन. 3026) ही दोन वाहने मिरजेकडे जात होती. त्या तीन वाहनांमध्ये धडक झाली. यामध्ये मल्लाप्पा माळी, परगोंडा माळी, कमला माळी, अशोक माळी, भाग्यश्री माळी, सोनू माळी (सर्व रा. इचलकरंजी), मालती कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी (दोघे रा. विजयनगर) हे आठ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Eight-injured-in-accident-on-Miraj-Mhaisal-road/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Eight-injured-in-accident-on-Miraj-Mhaisal-road/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬