[sangli] - सुट्टीत मामाच्या गावी नाही जायचं आपलं गाव पाणीदार करायचं(video)

  |   Sanglinews

मांजर्डे:वार्ताहर

तासगाव तालुक्यात सर्वत्र वॉटर कप स्पर्धेला जोर येत आहे. सर्वजण आपापल्या गावाला पाणीदार करण्यात व्यस्त आहेत. असेच डोर्ली व हातनोली येथील बालचमू सुद्धा दुष्काळाशी दोन हात करण्यास सज्ज आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत लाडक्या मामाच्या गावाला नाही जायचं तर आपलं गावच पाणीदार करायचं असा निर्धार बालचमुनी केला आहे.

तासगाव तालुक्यातील कायम दुष्काळी गाव म्हणून या गावांची ओळख. पावसाळा संपला की येथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जाणवत असते मग शेतीची अवस्था खूप बिकटच. पाणी उपसा योजना असतांना सुद्धा त्याचा हवा तसा लाभ मिळत नाही. त्यामुळे पाणयाची टंचाई नेहमीचीच आहे या गावात.

चालू वर्षी या गावानी तालुक्यातील अन्य गावांबरोबर पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.गावात पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा थेंब आणि थेंब शिवारात जिरवायचा असा निर्धार गावानी केला. लोकसभा निवडणुका लागल्या आणि गावातील अनेकजण आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त झाले. अशावेळी गावातील बाल जलदुत एकत्र आले त्यांनी ठरविल, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला किंवा दुसऱ्या कोणत्या गावी नाही जायचं तर सर्वांनी मिळून आपलं गाव पाणीदार करायचं. स्पर्धा संपल्यावरच गावाला जायचं....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/to-make-your-village-watery-determination-of-the-child-head-in-Dorley-and-Hattonli-village/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/to-make-your-village-watery-determination-of-the-child-head-in-Dorley-and-Hattonli-village/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬