[sangli] - २८१ कोटींची लटकली एफआरपी

  |   Sanglinews

सांगली : विवेक दाभोळे

जिल्ह्यात बहुसंख्य साखर कारखान्यांकडे आजअखेर तब्बल 280 कोटी 23 लाख 99 हजार 547 रुपयांच्या घरात ऊस उत्पादकांची एफआरपी थकीत राहिली आहे. हंगाम संपून आता सव्वा महिना झाला आहे. मात्र, अद्याप याबाबत साखर कारखानदार काहीच बोलत नाहीत.

2018-2019 च्या हंगामात 82 लाख 76 हजार 751 मे. टन ऊसाचे गाळप तर 90 लाख 75 हजार 404 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 11.37 इतका राहिला आहे. अर्थात आता साखरेचा हमीभाव जरी 3100 रुपये प्रतिक्विंटल निश्‍चित केला असला तरी साखरेचे उत्पादन प्रचंड झाल्याने बाजारात उठाव होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, एफआरपीची उर्वरित रक्‍कम देणे शक्य व्हावे यासाठी बहुतेक सर्वच कारखान्यांनी सॉफ्ट लोन तसेच आणि साखर निर्यात अनुदान यातून मिळणार्‍या उत्पादनावरच भरोसा ठेवला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/281-crore-FRP-is-pending/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/281-crore-FRP-is-pending/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬