[satara] - पत्रकार हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अखेर 15 दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरवळ पोलिसांच्या पथकाने पुणे येथील दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस दोघांकडे कसून चौकशी करत असून उर्वरित संशयितांचीही माहिती घेत आहेत. त्यामुळे घटनेमागचे नेमके कारण लवकरच उलगडणार आहे. दरम्यान, पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी संशयितांवर तत्काळ कारवाई होण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

इस्माईल मकानदार, रोहन पवार (दोघे रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुराद पटेल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 11 एप्रिल रोजी रात्री अनोळखी 5 ते 6 जणांच्या टोळक्याने शिरवळ येथे मुराद पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्‍ला केला. हा हल्‍ला एवढा गंभीर होता की पटेल यांच्या मान, तोंड, हात, पाठ, पायावर असे आठ वर्मी घाव बसले आहेत. यामुळे घटनास्थळी ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडले होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पत्रकारावर हल्‍ला झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे हे सातत्याने संपर्कात होते. त्यांनी संशयितांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Both-arrested-on-the-journalist-assault/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Both-arrested-on-the-journalist-assault/

📲 Get Satara News on Whatsapp 💬