[satara] - पारा ४३अंशांवर; जनजीवन भाजले

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

यंदाचा उन्हाळा जीवघेणा बनला असून सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची रविवारी नोंद झाली. सातारचा पारा रविवारी 43 अंशांवर जाऊन पोहोचला; तर त्याच वेळी थंड हवेचे महाबळेश्‍वरही कमालीचे उष्ण झाले. येथील तापमान 36.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले. उच्चांकी तापमानामुळे जिल्ह्यातील जनजीवन रविवारी अक्षरश: भाजून निघाले.

वातावरणातील बदलामुळे शुक्रवारपासून जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा असह्य होत आहे. रविवारीही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. जिल्ह्यात उकाडा हाच विषय चर्चेचा ठरला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत असह्य उकाडा जाणवत असून दुपारी आग ओकणार्‍या सूर्यामुळे बसणारे चटके आणि घामाच्या धारामुळे सातारकर चांगलेच हैराण झाले. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव शहर व परिसरात दिसून आला. रविवारी दुपारी उन्हाचे चटके बसत असल्याने अनेकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळले. दिवसभर सातारकरांनी पंखा, कुलर आणि एसीच्या वार्‍यालाच पसंती दिली. कामानिमित्त बाहेर पडलेल्यांनी टोपी, गॉगल अशी जय्यत तयारी करूनच आपला मोर्चा बाहेर वळवला. सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. अंग घामाघूम होत होते. अनेक घरांत रात्रीपासून सुरू केेलेले पंखे आज दिवसभर सुरूच राहिले. काही ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी झाडाखाली, बागेत थांबणे पसंत केले. वाढत्या उकाड्यामुळे अनेक जण तर दुपारी गार पाण्याने अंघोळ करत होते; पण अंघोळीनंतरही उन्हाचा त्रास जाणवतच होता....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Satara-cities-temperature-is-43-degrees/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Satara-cities-temperature-is-43-degrees/

📲 Get Satara News on Whatsapp 💬