[satara] - व्यावसायिकांवर येणार उपासमारीची वेळ

  |   Sataranews

कराड : प्रतिभा राजे

येथील जुन्या कृष्णा पुलाच्या जागी बांधण्यात येणार्‍या नवीन पुलाचे काम सध्या गतीने सुरू आहे. पिलरसाठी फौंडेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर जुना पुल आवश्यकतेनुसार पाडण्यात येईल अथवा यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने गेल्या अनेक वर्षापासून पुलाजवळ असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करू नये अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

कराड-विटा— मसूर— सोलापूर — पंढरपूर रस्त्यासाठी सध्या कृष्णा नदीवरील जुन्या व नवीन पुलाच्या मध्यभागी नवीन पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. नवीन पुलाच्या कामाची गती पाहता पुढील काही दिवसांनंतर जुना पुल वाहतूकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराड-विटाकडे जाणार्‍यांचा प्रवास नवीन पुलावरून सुरू होणार आहे. गुहागर-विजापूर या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गाच्या मजबुतीचे काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराकडून नोव्हेंबर 2018 पासून पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुना कृष्णा पुल पाडून त्याच ठिकाणी दोन्ही बाजूला फुटपाथसह उंची वाढवून आठ मीटर रुंदीचा नवीन प्रशस्त पुल तयार करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पुलाशेजारी मटण, मच्छी विक्रेते, फळ विक्रेते, ज्युस सेंटर, हॉटेल तसेच अनेक छोटे — मोठे असे 20 ते 30 व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. या व्यावसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/The-work-of-the-new-bridge-is-currently-underway/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/The-work-of-the-new-bridge-is-currently-underway/

📲 Get Satara News on Whatsapp 💬