[satara] - विहिरींनी तळ गाठल्याने लोकांची भटकंती

  |   Sataranews

ढेबेवाडी : प्रतिनिधी

वाढत्या उन्हाळ्याबरोबरच ढेबेवाडी विभागात पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येतही वाढ व्हायला लागली असून कुंभारगांव विभागातल्या गलमेवाडी येथे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सध्या नळ पाणीपुरवठा योजनेतून आठवड्यात एकदा पाणी पुरवठा सुरू आहे. पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे तर आता खासगी टँकरने पाणी खरेदी करून कांही ग्रामस्थ पाण्याची गरज भागवित आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गलमेवाडी हे कुंभारगाव विभागातील महत्त्वाचे व पाटण तालुक्याच्या दक्षिणे सिमेवरचे शेवटचे गांव आहे. गलमेवाडीसाठी शेंडेवाडी ता.पाटण येथील पाझर तलावाच्या खाली एक विहीर खुदाई करून त्या विहिरीतून वरेकरवाडी, चिखलेवाडी आणि गलमेवाडी या तिन ग्रामपंचायतींच्या तिन नळ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. नळयोजनेच्या विहिरीतील पाण्याचे स्रोतही कमी झालेले आहेत त्यामुळेच पाणी कमी झाल्याने सर्वांना सुरळीत व पुरेसे पाणी मिळत नाही. गलमेवाडीला सध्या साधारण आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो मात्र तेवढ्या पाण्यात कुणाचीही गरज भागत नाही त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी सर्वत्र भटकंती करावी लागते,खासगी विहिरी, बोअर,वा जिथे मिळेल तिथून पाणी मिळवावे लागते व त्यासाठी आता काही कुटंबांना विकत पाणी घेण्याची व पैसे मोजायची वेळ आली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/peoples-searching-water/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/peoples-searching-water/

📲 Get Satara News on Whatsapp 💬