[solapur] - सोलापुरात ४ लाख लोकांना२२३ टँकरने पाणीपुरवठा

  |   Solapurnews

सोलापुरात ४ लाख लोकांना

२२३ टँकरने पाणीपुरवठा

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक पुरते हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाने जवळपास ७०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला होता. यंदाच्या उन्हाळ्यात अशी परिस्थिती नसली तरी सुद्धा आजमितीला टँकरने द्विशतक गाठले आहे. अर्थात पाणीटंचाई तीव्र जाणवत असल्याचे दिसून येते. वाड्या-वस्त्यांवरील नागरिक पाण्यासाठी वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.

एप्रिलअखेर उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. २६ एप्रिलअखेर जिल्ह्यातील १९८ गावे व १३०५ वाडी-वस्तीवरील ४ लाख १२ हजार ७२६ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात ४५ गावांना ५४ तर सांगोला तालुक्यातील ४३ गावांना ४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पंढरपूर तालुक्यात अद्याप एकही टँकरची मागणी आली नाही. उर्वरित तालुक्यातील टँकरची संख्या पाहता मे महिन्यात टँकरची संख्या तीनशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ago03wAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬