[thane] - कल्याण लोकसभेत १२ हजार नवमतदार

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात असून या मतदारसंघात १० एप्रिलपर्यंत नावनोंदणी केलेले १९ लाख २७ हजार ६०८ मतदार आहेत. या मतदारांचा वयोगट पाहिला असता ३० ते ५० वयोगटातील मतदाराची संख्या ५० टक्के इतकी आहे. या मतदार संघात नव्या मतदाराची संख्या केवळ १२ हजार इतकीच आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात आजवर केवळ ४० टक्के मतदान झाले असून यंदा मतदारांना मतदान करण्याचे केलेले आवाहन आणि मतदारांचा उत्साह पाहता मतदानाची चाळीशी संपण्याची आशा आहे. या मतदारसंघात नव्याने नोंदणी झालेले १२ हजार ३३६ मतदार आहेत. २० ते २९ वर्षे वयोगटातील २ लाख ६६ हजार मतदार असून ३० ते ४० वयोगटातील ४ लाख ५८ हजार आणि ४० ते ५० वयोगटातील ४ लाख ९४ हजार मतदार आहेत. तर ५० ते ६० वयोगटातील ३ लाख ५८ हजार, ६० ते ७० वयोगटातील २ लाख ४ हजार, ७० ते ८० वयोगटातील ८९ हजार आणि ८० ते ८९ वयोगटातील ४ लाख ३७ हजार मतदार आहेत. ९०पेक्षा जास्त वयोगटातील एकही मतदार या मतदारसंघात नाही. या वयोगटाची सरासरी पहिली असता ५० टक्के मतदार हे ३० ते ५० वयोगटातील आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7kUNOQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬