[thane] - डोंबिवली शहरात वाहतूकमार्गात बदल

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली

लोकसभेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले असून काही मार्गांवरील वाहतूक तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. डोंबवली पूर्वेकडे आयरे रोड येथील आयईएस पाटकर विद्यालय, येथे निवडणूक कामकाजासाठी साहित्य वितरण करणे आणि निवडणूक संपल्यानंतर पुन्हा जमा करण्यासाठी २८ ते ३० तारखेदरम्यान या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ गल्ली क्रमांक २ या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तसेच जुना आयरे रोड राजाजी पथ गल्ली क्रमांक २ ते मदन ठाकरे रोड या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रवेश बंद करण्यात आला असून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व वाहने राजाजी पथ गल्ली क्रमांक १, चिपळूणकर रोडने एस. के. चौक टंडन रोड, म्हाळगी चौकमार्गे स्थानक परिसरातून इच्छितस्थळी जातील. राजाजी पथ मार्गावरील स्वामी नारायण मंदिर रोड ते रामनगर पोलिस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावर या काळात पार्किंग करण्यास सवलत देण्यात आली आहे. या अधिसूचनेतून पोलिस, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yifRGAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬