[thane] - तापमान चाळीशीपार!

  |   Thanenews

मुंब्रा अग्निशमन केंद्र परिसरात ४१ अंश सेल्सिअसची नोंद

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाणे शहरातील तापमान चाळीशी पार पोहचले असून रविवारी मुंब्रा अग्निशमन केंद्र परिसरातील तापमापन यंत्रामध्ये ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, दिवा वॉर्ड कार्यालय, टीएमसी मुख्यालय, कळवा विटावा टीएमसी स्कूल आणि ट्राफिक पार्क मानपाडा या सर्व ठिकाणी किमान २८ अंश सेल्शिअस, तर कमाल ४१.९ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या तापमानवाढीमुळे पहाटे हवेत जाणावणारा गारवाही कमी झाल्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबईमध्येही तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे.

वाढत्या तापमानामुळे सकाळपासून दुपारपर्यंत उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने ठाणेकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. तरीही काम, व्यवसाय आणि बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडणे गरजेचे असल्याने संध्याकाळची वेळ निवडली जात आहे. या आठवड्यात दुपारची तुरळक गर्दी दिसून येते. गेल्या काही दिवसांत ठाणे शहराच्या तापमानाचा पारा ३० अंशांवरून ४० अंशांवर पोहोचला आहे. सकाळपासून उन्हाचे चटके व झळा बसत असल्यामुळे टोपी, स्कार्फ, सनकोट, ग्लोज यांचा वापर केला जात आहेत. महापालिकेच्या हवामान प्रदूषण नियंत्रण विभागाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. तापमान वाढल्यामुळे थंडगार पदार्थांचीही मागणी वाढली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागल्याने तहान शमविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेयांकडे वाढला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dFyXXwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬