[thane] - विधी प्रवेश परीक्षा १ जूनला

  |   Thanenews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधी शाखेतील तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या 'एमएएच एलएलबी-३'च्या सीईटीला यंदा विक्रमी नोंदणी केली आहे. तब्बल ४४ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी यंदा अर्ज केले आहेत. तर गेल्यावर्षी हा आकडा ३२ हजार ३३६ इतका होता.

राज्यभरात १४ हजार ३२० जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी ४४ हजार ६१९ अर्ज आले आहेत. यंदा नव्याने १० महाविद्यालये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी ५०० जागा वाढतील अशी अपेक्षा आहे. राज्याबाहेरील ३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांमध्ये २६ हजार ६९ विद्यार्थी आहेत. तर १४ हजार ४२० विद्यार्थिनी आहेत.

येत्या १ जूनला ही राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि राज्याबाहेर १३ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने तीन सत्रांत नियोजन करण्याचे सीईटी सेलकडून प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीचे आणि त्यांना जवळच केंद्र देण्यासंदर्भात सीईटी सेल प्रयत्नशील असल्याचे आयुक्‍त आनंद रायते यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/E22FWAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬