[yavatmal] - वणीत आयपीएल सट्ट्यावर पुन्हा धाड, चार बुकींना अटक

  |   Yavatmalnews

वणी: वणीत सुरू असलेल्या आयपीएल सट्टा जुगारावर वणी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कार्यवाहीत चार बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन दिवसांआधी चिखलगाव येथे धाड टाकून आयपीएलवर सट्टा चालवणा-या काही बुकींना अटक केली होती.

आयपीएल वर सट्टा चालवणा-या बुकींचा वणीत चांगलाच धंदा सुरू आहे. शनिवारी राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैदराबाद यांच्यात 20-20 चा सामना होता. या सामन्यावर प्रत्येक बॉलसाठी आणि सामन्यासाठी सट्टा लावल्या जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांना मिळाली. त्यांनी लगेच वणी पोलीस स्टेशचे कर्मचारी व डीबी पथकाला सोबत घेऊन वणी शहराला लागून असलेल्या गणेशपूर गावाजवळील साईलीला ले आऊट मध्ये एका मोकळ्या जागेत एक पांढ-या रंगाची मारोती सुझुकी (MH 34 BF 4977) कार दिसून आली. या शेजारीच चार तरुण मोबाईल फोनवरून प्रत्येक बॉलसाठी सट्टा चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगचे या चारही तरुणांना अटक केली. मंगेश विठ्ठल खाडे (30) रा. मंगलम पार्क चिखलगाव, सलमान बेग अकबर बेग (28) रा. शास्त्रीनगर वणी, अब्दुल सादिक अब्दुल हमीद (28) रा. शास्त्रीनगर, वणी व शेख तौसीब शेख जमीर (30) रा. भिवापूर वार्ड चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. या सट्टा लावणाऱ्याकडून 9 मोबाईल हॅन्डसेट, एक लॅपटॉप, आकडे लिहिलेला कागद, एक मारोती स्विफ्ट डिजायर कार व नगदी 900 असा एकूण 7 लाख 96 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोबाईल फोनवर लोकांकडून पैसे घेऊन प्रत्येक बॉल, विकेट व सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या चारही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

फोटो - http://v.duta.us/4dfRzQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XHdkcgAA

📲 Get Yavatmalnews on Whatsapp 💬