आगळगाव परिसरात वादळी वार्‍याचा तडाखा

  |   Sanglinews

नागज : वार्ताहर

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, शेळकेवाडी, केरेवडी, आरेवाडी परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या गारपीटीमुळे द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी रात्री कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्वभागातील आगळगाव, नागज, ढालगाव परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. रात्री सव्वादहा वाजल्यापासून सुमारे तासभर वीज, वारा, पाऊस व काही ठिकाणी गारांचा आकांडतांडव सुरू होता. पावसापेक्षा वारा जास्त असल्याने परिसरातील अनेक झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.शेळकेवाडी तसेच केरेवाडी व आगळगावच्या काही भागात वादळी वार्‍याबरोबरच गारपीट झाली.

आंब्याएवढ्या आकाराच्या गारा पडल्याने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागेच्या काड्यांवर गाराचा तडाखा बसल्याने काड्या निकामी होण्याची भीती आहे. गारांच्या मार्‍याने बागेतील पाने तुटून पडली आहेत. झाडावरील पानेही फाटल्याने अन्ननिर्मितीची प्रक्रिया थांबून मोठे नुकसान होणार आहे. आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी व आरेवाडी येथील सुमारे नव्वद शेतकर्‍यांच्या द्राक्षबागांवर गारा व वादळी वार्‍याचा तडाखा बसून काड्या व पानांचे मोठे नुकसान झाले आहे. आगळगाव येथील 52 हेक्टर, शेळकेवाडी येथील 7 हेक्टर व आरेवाडी येथील दोन एकर द्राक्षबागेचे गारपीट व वादळी वार्‍याने नुकसान झाले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/wind-storm-in-agalgaon-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/wind-storm-in-agalgaon-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬