इस्लामपूरचे दोघे अपघातात ठार

  |   Sanglinews

सांगली / आष्टा : प्रतिनिधी

भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दीर व भावजय ठार झाले, तर आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. आष्टा (ता. वाळवा) येथील मिरजवाडीजवळ रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरा आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शिवाजी बाळासाहेब मोहिते (वय 60) व सविता तानाजी मोहिते (45, रा. यल्लमा चौक, बुरूड गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा) अशी मृत दीर, भावजयचे नाव आहे. सविता मोहिते यांचा मुलगा विशाल (8 वर्षे) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

मोहिते कुटुंबाचे सांगलीत विजयनगरमध्ये नातेवाईक आहेत. त्यांच्या घरी रविवारी सकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यासाठी शिवाजी मोहिते, सविता व विशाल मोहिते हे दुचाकीवरून (एमएच 11 पी 1445) विजयनगरला आले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी इस्लामपूरला जाण्यासाठी निघाले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/two-killed-in-accident-near-ashta/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/two-killed-in-accident-near-ashta/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬