कापशी, शिवर तलावातून ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा

  |   Akolanews

ठळक मुद्देकापशी तलावातील पाच जेसीबीने ११०२ तास काम केले असून, ५८५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.शिवर तलावातून दोन जेसीबीद्वारे २५१३० घनमीटर गाळ काढण्यात आला असून, मशीन ७१८ तास चालल्या आहेत. या दोन तलावांमध्ये आठ कोटी लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे.

अकोला: भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पांतर्गत कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, या दोन तलावांमध्ये आठ कोटी लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहिती सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुभाष गादिया यांनी दिली आहे.

कापशी तलावात २७ एप्रिलपासून ५ जेसीबी मशीन आणि शिवर तलावात ६ फेब्रुवारीपासून दोन जेसीबी मशीन सुरू असून, या मशीनसाठी राज्य सरकार डीझल उपलब्ध करून देत आहे....

फोटो - http://v.duta.us/Aghj9wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/peVR6AAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬