कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये डॉ. सुभाष पाटील यांना कांस्य पदक

  |   Sanglinews

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

अत्यंत कठीण आणि नामांकित अशा कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये तालुक्यातील अलकुड (एम) येथील डॉ. सुभाष गणपती पाटील यांनी टाईम स्लॉटमध्ये कांस्य पदक पटकाविले. डर्बन ते पीटर्सबर्ग हे 90 किलोमीटरचे अंतर डॉ. पाटील यांनी केवळ 10 तास 56 मिनिटांत पूर्ण करून भारताचा तिरंगा मानाने उंचविला. जगभरातून 20 हजार तर भारतातून 160 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

कॉम्रेडस मॅरेथॉनविषयी माहिती

कॉम्रेडस मॅरेथॉन जगातील एक अतिशय अवघड, माणसाच्या शारीरिक व मानसीक क्षमतेचा कस बघणारी व प्रत्येक धावपटूला आयुष्यात एकदा तरी ही स्पर्धा पात्त होवून पूर्ण करावी असे वाटते. स्पर्धा दाक्षिण आफ्रिकेमध्ये डर्बन या समुद्रसपाटीवर असलेल्या शहरातून चालू होवून पीटर्सबर्ग येथे संपते. एकूण अंतर ९० किलोमीटर इतके आहे. पूर्ण स्पर्धा घाटामध्ये आहे. पीटर्सबर्ग येथे पोहोचेपर्यत समुद्रसपाटीपासून ११०० मीटर इतक्या उंचीवर आपण पोहचतो. स्पर्धा काल (दि. 9) सकाळी साडेपाच ते सांयकाळी साडेपाच यावेळी झाली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/In-the-Comrade-Marathon-Dr-Subhash-Patil-got-bronze-medal-in-the-time-slot/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/In-the-Comrade-Marathon-Dr-Subhash-Patil-got-bronze-medal-in-the-time-slot/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬