जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  |   Sanglinews

जत : शहर प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून जत येथील सचिन चंद्रकांत विटेकर याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडित मुलीने जत पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन विटेकर व मुलीची दोन वर्षांपासून मैत्री होती.त्याने चार जून रोजी पीडित मुलीस फोन करून आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे आमिष दाखवले. त्याच रात्री दोनच्या सुमारास ते दोघे मोटारसायकलने सांगलीस आले.

सांगलीत सचिनने पीडित मुलीस मामा मिथुन गोंधळे यांच्या घरी ठेवले. मामा गोंधळे बाहेर गावी गेले होते. सात जूनला ते परत आले. त्यांनी पीडित मुलीस व सचिन यास येथे का आला आहात, अशी विचारणा केली.

शिवाय मुलीचे वयदेखील कमी असल्याने मामा गोंधळे यांनी जतला फोन करून सचिनच्या घरी सांगितले. दरम्यानच्या काळात सचिनने पीडित मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. सात जूनला पीडित मुलीला जतला मोटारासायकलने आणून सोडले आणि सचिन पसार झाला. पीडित मुलीने जत सचिन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Rape-of-a-minor-girl-in-Jat/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Rape-of-a-minor-girl-in-Jat/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬