जिल्ह्यात ७३ हजार ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर!

  |   Akolanews

अकोला : जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये ३७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, या गावांमधील ७३ हजार ३९८ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे.

तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत तीव्र पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील ३४ गावांमध्ये प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सहा शासकीय आणि ३१ खासगी अशा एकूण ३७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, संबंधित ३४ गावांमधील ७३ हजार ३९८ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाण्यावर भागविण्यात येत आहे.

टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!...

फोटो - http://v.duta.us/29ZhEwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hDIabQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬