धरणग्रस्तांचे प्रश्‍न मंत्रिमंडळात मांडणार : ना. नितीन बानुगडे-पाटील

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीप्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. या प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही. महामंडळाच्या पातळीवरील प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र धोरणात्मक किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन व राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात मांडले जातील, असे आश्‍वासन महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिले. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ‘तक्रार निवारण परिषद’ ना. नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीस सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सहाय्यक अधीक्षक अभियंता अभय काटकर, कार्यकारी अभियंता पी. डी. जाधव, संजय बोडके, शशिकांत गायकवाड, प्रविण चावरे, सुरेंद्रनाथ हिरे आदि प्रमुख उपस्थित होते. तक्रार निवारण परिषदेत विविध सुमारे 450 तक्रारी करण्यात आल्या. उरमोडीचा उजवा कालवा 20 वर्षांपासून रखडला असून पुनर्वसित गावांसाठी तो महत्वाचा आहे. अतीतचे बरेच क्षेत्र वंचित राहिले असून त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दोन्ही आमदारांनी सांगूनही संबंधित अधिकार्‍यांनी अद्याप नकाशा दिला नसल्याची तक्रार धरणग्रस्तांनी केली. टेंभू उपसा सिंचन योजनेचे सर्कल ऑफिस सांगलीला असून त्याचे उपविभागीय कार्यालय ओगलेवाडी (ता. कराड) येथे आहे. हेळगाव (जि.सांगली) येथील एमआय टँकचे पाणी शामगावच्या टेकावर आणल्यास गावची तहान भागेल. मात्र त्यादरम्यान 2.5 कि.मी.चा टप्पा असून ते करण्यासाठी प्रस्ताव देणे गरजेचे आहे. अभियंते या कामाचा प्रस्ताव तयार करत नाहीत. सांगलीतील पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातून मागणी केलेला खाजगी परवाना चालतो मग सार्वजनिक हितासाठी पाणी का नाही? 20-25 गावांचे हेलपाटे झाले पण तेथील कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार जागेवर नसतात, अशीही तक्रार झाली. पिंपोडे (ता. कोरेगाव) परिसरातील सोनके, सोळशी, नांदगाव ही गावे वसना व वांगना उपसा सिंचन योजनेपासून वंचित असून या गावांना पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Demand-for-damages-will-be-presented-in-the-Cabinet/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Demand-for-damages-will-be-presented-in-the-Cabinet/

📲 Get Satara News on Whatsapp 💬