पाटण तालुक्याला पाणी का नाही? : डॉ. भारत पाटणकर

  |   Sataranews

पाटण : प्रतिनिधी

धरणांसाठी स्वतःच्या जमिनी देऊन पाटण तालुक्यातील जनतेने त्याग केला आहे. मात्र त्यानंतरही पाटण तालुक्याला पुरेसे पाणीच मिळत नाही. त्यामुळेच आठ सप्टेंबरला पाटण तालुका समान पाणी वाटप हक्क परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत कोयना धरणग्रस्त व पाटण तालुक्यातील शेतकरी सहभागी होणार असल्याची घोषणा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

कोयनानगर (ता. पाटण) येथे श्रमिक मुक्ती दलाकडून शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, भगवान भोसले, महेश शेलार, सचिन कदम, विठ्ठल सपकाळ, सिताराम पवार, श्रीपती माने, आनंद ढमाल, यांची प्रमुख उपस्थिती होती,

डॉ. पाटणकर म्हणाले, सर्वात जास्त पाऊस पाटण तालुक्यात पडतो. त्यामुळे पाटण तालुक्यात कोयना धरणासह अनेक धरणे झाली आहेत. त्याचे सगळे पाणी दुसर्‍या तालुक्यांना, जिल्ह्यांना तसेच राज्यांनाही गेले. पाटण तालुका मात्र कोरडाच राहिला असून तालुक्यातील जनतेला पहिले पाणी मिळायला पाहिजे होते. मात्र ते का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित केला. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या लढ्यामुळे कोयनेला 1986 पासून 1015 पर्यंतचा नवा कायदा लागू झाला आहे. नागरी सुविधांचा देण्याचा निर्णय झाला, हे कोयनेच्या जनतेने मोठा संघर्ष केल्यामुळे शक्य झाले आहे. 19 मार्च 2018 रोजी कोयनेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्याशी बैठक होऊन धोरणात्मक निर्णय झाले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/why-not-water-Patan-taluka/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/why-not-water-Patan-taluka/

📲 Get Satara News on Whatsapp 💬