‘पुढारी एज्यु’मुळे विद्यार्थी-पालकांचे खुलले चेहरे

  |   Sataranews

सातारा: प्रतिनिधी

सलग तीन दिवस चाललेल्या ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनामुळे अनेक शंकांचे निरसन झाले असून करिअरच्या नव्या दिशा मिळाल्या, अशा भावना व्यक्‍त करताना विद्यार्थ्यांसह पालकांचेही चेहरे खुलले. रविवारी या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी तर अवघे पोलिस करमणूक केंद्र विद्यार्थी व पालकांनी ओसंडून वाहिले. त्यांनी या उपक्रमाबाबत भरभरून बोलताना या प्रदर्शनामुळे खर्‍या अर्थाने शैक्षणिक पर्वणी लाभल्याचे सांगितले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे, चाटे एज्युकेशन संस्था, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7, 8 व 9 रोजी ‘पुढारी’ एज्यु दिशा 2019 हे प्रदर्शन पार पडले. सलग तीन दिवस विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक पंढरीचा अनुभव या प्रदर्शनस्थळी आला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Opening-Educators-Students-Parents-Open-Face/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Opening-Educators-Students-Parents-Open-Face/

📲 Get Satara News on Whatsapp 💬