पालखी सोहळा यंदा प्रथमच ऑनलाईन

  |   Sataranews

सातारा : प्रविण शिंगटे

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू येथून दि.24 जून रोजी तर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी येथून दि. 25 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदापासून माऊलींचा हा सोहळाही हायटेकच्या दिशेने निघाला असून तो ऑनलाईन होणार आहे. पालखी सोहळा मार्गावर वारकर्‍यांची गैरसोय होवू नये यासाठी दोन्ही पालखी सोहळ्याचा एकत्रित असा वॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी या ग्रुपशी कनेक्ट असून समन्वयासाठी हा ग्रुप महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थानास 16 ते 17 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांनी ज्या ज्या विभागाकडे कामे वाटप करून दिली आहेत त्यामुळे संबंधित यंत्रणा अलर्ट झाली आहे.शासनाच्या विविध योजनांच्या व धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आता व्हॉटसअ‍ॅपचा वापर होवू लागला आहे. त्यामुळे पालखी सोहळाही आता हायटेक होत चालला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम देहू, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, उंडवडीसुपे, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापुर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची करोली येथे होणार आहे. तर संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचा मुक्काम आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव आदी ठिकाणी होणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Palkhi-Sohala-online-This-is-the-first-time-this-year/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Palkhi-Sohala-online-This-is-the-first-time-this-year/

📲 Get Satara News on Whatsapp 💬