मिरजेला कोंडवाड्यातून सोडवा

  |   Sanglinews

मिरज : जालिंदर हुलवान

अरूंद रस्ते, ही एक मिरज शहरातील मोठी समस्या आहे. शहरातील बहुतांशी रस्ते हे अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. येथील छत्रपती शिवाजी रस्त्याचे रूंदीकरण तर गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. एकीकडे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहेत आणि दुसरीकडे दिवसेंदिवस नागरिकांकडून होत असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहेत. रस्ते रूंद करण्याचे धाडस दाखविण्याची गरज आहे. महापालिकेतील पदाधिकार्‍यांनीही अधिकार्‍यांवर दबाव न टाकता हा प्रश्‍न निकालात काढला पाहिजे. विकासासाठी जनतेने भाजपला महापालिकेत सत्ता दिली आहे, हे त्यांना विसरून चालणार नाही.

येथील छत्रपती शिवाजी रस्ता हा प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जातो. शहराला तसा बायपासचा एकही रस्ता नसल्याने शहरातील वाहने व शहराबाहेरून येणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता रूंद करण्याची गरज आहे. 2011 मध्ये हा रस्ता रूंद करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. पण आजपर्यंत या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्गामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. रस्त्यावरील विजेचे काही धोकादायक खांब जसेच्या तसे आहेत. ते काढण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरील खड्डे व अरूंद रस्त्यामुळे या रस्त्याने गेल्या दहा वर्षात सुमारे दहाहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. अनेकजण जखमी झालेले आहेत. आता या रस्त्यासाठी 100 कोटी रूपये मंजूर झाल्याची घोषणा आमदार सुरेश खाडे यांनी केली होती. ते काम सुरू झालेले नाही....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/The-roads-in-Miraj-city-are-awaiting-the-expansion-for-many-years/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/The-roads-in-Miraj-city-are-awaiting-the-expansion-for-many-years/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬