मिरज, आटपाडी, तासगाव तालुक्यात दमदार पाऊस

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यांत रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मिरज तालुक्यात एरंडोली येथे भिंत कोसळून दोघे जखमी झाले. मिरज येथे विजेच्या तारेचा धक्का लागून म्हैस ठार झाली. मिरज - सलगरे रस्त्यावर गणेशनगर येथे झाड उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे वादळामुळे छप्परावरील पत्रे उडून गेले. ठिकठिकाणी गारा पडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सांगली शहरात सायंकाळी तुरळक, तर मिरजेत मध्यम स्वरुपात पाऊस झाला. कमानवेस मिरज येथे विजेच्या धक्का बसल्याने उदय लवंद यांची म्हैस ठार झाली. तालुक्यातील एरंडोली येथे जोरदार वार्‍यामुळे घराची भिंत कोसळून लालासाहेब कृष्णाराव पाटील व त्यांची पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले. पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत खंडीत झाला होता. कवठेपिरानसह परिसरात तुरळक पाऊस झाला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Heavy-rain-in-Miraj-Atpadi-Tasgaon-taluka/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Heavy-rain-in-Miraj-Atpadi-Tasgaon-taluka/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬