म्हैसाळ पाण्यासाठी कुंभारीत रास्ता रोको

  |   Sanglinews

जत : शहर प्रतिनिधी

म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यातून येणारे पाणी पैसे भरुनहीं सोडण्यात आले नाही. पाणी सोडावे म्हणून जत तालुक्यातील कुंभारी, प्रतापपूर, गुळवंची , कोसारी, बिरनाळ, तिप्पेहळी बागेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी विजापूर ते गुहागर राज्यमार्गावरकुंभारी येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू करावे व त्यातून पैसे भरलेल्या व मागणी असलेल्या गावांना पाणी द्यावे. सहा महिन्यापूर्वी पैसे भरण्यात आले आहेत. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. सध्या गावात पाणी व चारा टंचाई जाणवत असून बागायती पिके वाळू लागली आहेत. पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन केले असल्याची माहिती नाथा पाटील यांनी दिली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Stop-the-Kumbhar-path-for-Mhasal-water/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Stop-the-Kumbhar-path-for-Mhasal-water/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬