[ahmednagar] - जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

रविवारी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. संगमनेर, अकोले व जामखेड तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. नगर तालुक्यातील वाळकी येथे जोरदार वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेले. दरम्यान, कर्जत, राहुरी, श्रीगोंदे या तालुक्यांतील काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. या तालुक्यात अंगावर वीज पडल्यामुळे भोजदरी येथे एका बैलाचा मृत्यू झाला. संगमनेर-अकोले रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे व विद्युत खांब पडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. येथील वाहतूक सुरळीत करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अकोले तालुक्यामध्येही रविवारी पावसाने हजेरी लावली.

जामखेड शहर व तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे छावणीतील जनावरांच्या गोठ्यांचे छत उडून गेले. तर, अरोळे झोपडपट्टी येथे घरावरील पत्रे उडून वृद्ध महिला जखमी झाली असून घरातील संसारोपयोगी वस्तू व धान्य भिजले. कर्जत, श्रीगोंदे, राहुरी या तालुक्यांतील काही भागांमध्ये रविवारी मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान, नेवासे तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची रविवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाहणी केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/umBWDgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬