[ahmednagar] - जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी

  |   Ahmednagarnews

आरोळेवस्तीवर महिला जखमी; छत उडाल्याने छावण्यातील जनावरांचे हाल;

म. टा. वृत्तसेवा, जामखेड

जामखेड शहरासह तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक छावण्यांमधील जनावरांसाठीचे छत उडून गेले. अरोळेवस्ती येथे घरावरील पत्रे उडाले. यात वृद्ध महिला जखमी झाली असून घरातील संसारोपयोगी वस्तू व धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले.

उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मागील चार पाच दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण होत होते. पाऊस येईल या आशेने सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दोन दिवसांपासून उकाडाही वाढला होता. रविवारी सायंकाळी जोरदार विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

आरोळेवस्ती जवळ छगन निमोणकर व आशाबाई निमोणकर हे वयोवृद्ध दाम्पत्य घरात असताना छतावरील पत्रे उडाले. त्यातील एक पत्रा आशाबाई यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चारा छावण्यांवर जनावरे बांधलेल्या ठिकाणाचे छत उडून गेले. वाटप केलेला ओला चारा व पशुखाद्य भिजल्याने नुकसान झाले. अनेकांनी आपली जनावरे घरी नेऊन बांधली. आजच्या पावसाने खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे....

फोटो - http://v.duta.us/yH3SAgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hWSQqwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬