[ahmednagar] - नगरमध्ये पावसाचे प्रमाण घटले

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

एक ते आठ जून या कालावधीमध्ये जिल्ह्यात सरासरी अवघ्या पावणेचार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी या काळात सरासरी ४३ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झाली होती. दरम्यान, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ८ जूनपर्यंत पावसाची कोणतीही नोंद झाली नाही.

मागील वर्षी म्हणजेच जून २०१८ ते ऑक्टोबर २०१८ या काळात जिल्ह्यात सरासरी ७० टक्के पाऊस झाला होता. अल्प पावसामुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. साधारणपणे नगर जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीला व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडतो. गेल्या वर्षीही ८ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४३ मिलिमीटर अवकाळी पाऊस पडल्याची जिल्हा प्रशासनाची आकडेवारी आहे. यंदा मात्र ८ जूनपर्यंत अवघ्या पावणेचार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे....

फोटो - http://v.duta.us/gJ4IBwEA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/54oxGgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬