[ahmednagar] - विरोधकांनी धरले संचालकांना धारेवर

  |   Ahmednagarnews

झेडपी सभेत अहवालातील त्रुटीचा मुद्दा उपस्थित

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नगरमध्ये पार पडली. या सभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवर संचालक मंडळास धारेवर धरले. सोसायटीने सभासदांना दिलेल्या वार्षिक अहवालात त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर सत्ताधाऱ्यांनीही चूक झाल्याचे मान्य करून यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत रासकर, व्हाइस चेअरमन मोहन जायभाये, संचालक संजय कडूस आदी उपस्थित होते.

या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या सुरुवातीस सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर याआधीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून कायम करण्यात आले. त्यानंतर सभासदांनी विविध मुद्दे व शंका उपस्थित केल्या. सभासदांच्या शंका व प्रश्नांना सभेचे अध्यक्ष राजेश परजणे व संस्थेचे चेअरमन शशिकांत रासकर यांनी उत्तरे दिली. या चर्चेत सभासद विकास साळुंके, अंबादास जमदाडे, कल्याण मुटकुळे, सोमनाथ भिटे, एम. पी. कचरे, रवींद्र मांडे, संभाजी आव्हाड, बाळासाहेब दरेकर, मनोज चोभे, प्रताप शेटे आदींनी सहभाग घेऊन विविध प्रश्न उपस्थित केले तसेच संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने सूचना मांडल्या. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेतील सर्व ठरावांचे वाचन करून कायम करण्यात आले. अशोक काळापहाड, अरुण जोर्वेकर, भरत घुगे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरुण शिरसाठ, विलास वाघ, प्रताप गांगर्डे आदींसह सभासद या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/FCU3dgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1O8TXgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬