[aurangabad-maharashtra] - डीसीपीएस हिशेब स्लिप आठवडाभरात देणार

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंशदायी पेन्शन योजनात (डीसीपीएस) सहभागी शिक्षकांना हिशेब स्लिप आठवडाभरात देण्यात येतील, असे आश्वासन लेखाधिकारी साधना बांगर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास दिले.

मागील पाच वर्षांपासून शिक्षकांच्या 'डीसीपीएस' कपातीचा हिशेब मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला ३० एप्रिलपर्यंत या हिशेब स्लीप देण्याचे आश्वासन दिले होते परंतु, तांत्रिक अडचणी व निवडणुकांमुळे यामध्ये विलंब होत होता. शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत लेखाधिकारी साधना बांगर यांची भेट घेतली. सातत्याने पाठपुरावा करूनही स्लीप देण्यासाठी दिरंगाई होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. श्रीमती बांगर यांनी सांगितले, की कपातीचा हिशेब जुळविण्याचे काम पूर्ण झाले असून, स्लिपची छपाई सुद्धा पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यात या स्लिपची पुनर्पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते स्लिप वितरीत करणार असल्याची ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iU2huwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬