[aurangabad-maharashtra] - नव्या विमानसेवेच्या चर्चेसाठी शिष्टमंडळ जाणार दिल्लीला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यटन उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांच्या संख्येत वाढ होण्याची गरज आहे. ही संख्या वाढवण्याची मागणी शहरातील टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यवसायिक सातत्याने करीत आहेत. या संदर्भात मंगळवारी औरंगाबादवरून एक शिष्टमंडळ चर्चेसाठी दिल्लीला रवाना होणार आहे.

औरंगाबाद शहरातून मुंबई, दिल्ली, राजस्थान, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू ही महत्वाची शहरे जोडण्यात यावी. वेरूळ - अजिंठा लेणीमुळे बुद्धीस्ट सर्किटमध्ये औरंगाबादचा समावेश करावा. ही मागणी सातत्याने होत आहे. यासाठी औरंगाबादच्या शिष्टमंडळाला येत्या ११ आणि १२ जून रोजी चर्चेसाठी एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर आणि इंडिगोच्या संचालकांनी बोलावले आहे. या अनुषंगाने नव्यानेच स्थापन झालेल्या औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रणब सरकार हे त्यांच्यासोबत चर्चेसाठी जात आहेत. या बैठकीतून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/FIlRlwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬