[aurangabad-maharashtra] - शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवप्रेमींकडून अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढिवण्याबाबत मागणी होत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पुतळ्याला चहुबाजूंना पत्रे लावण्यात आले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

क्रांतीचौकात उड्डाणपूल उभारण्यात आला तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. शिवजंयती उत्सव समितीनेही पाठपुरावा केला. शिवप्रेमींकडून वाढता दबाव लक्षात घेऊन महापालिकेकडून कामाचे भूमिपूजन केले मात्र, वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नव्हती. याबाबत वारंवार महापालिकेकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. संतप्त शिवप्रेमींनी महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, हे काम उद्याच सुरू करतो, अशा शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यावेळी महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली....

फोटो - http://v.duta.us/FADfqAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kvGAwAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬