[aurangabad-maharashtra] - सोळा वर्षांच्या मुलासह तरुणाची आत्महत्या

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोळा वर्षांच्या मुलासह ३५ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना हनुमानगर आणि जटवाडा रोड भागात शनिवारी उघडकीस आल्या. या प्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गारखेडा हनुमाननगर भागात अनिकेत संजय शेळके (वय १६) या मुलाने शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. छताला लावलेल्या हुकला त्याने स्कार्फच्या मदतीने गळफास घेतला. अनिकेतला नातेवाईकांनी तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अनिकेतच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचा दुसरा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा वाजता राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड येथे घडला. येथील कैलास भिसन कायरल (वय ३५) यांनी सिलिंग फॅनला सर्व्हिस वायरने गळफास घेत आत्महत्या केली. कैलास याला नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कैलासच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PA1_LwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬