[kolhapur] - कोल्हापुरात रिपरिप

  |   Kolhapurnews

कोल्हापूर

शहर आणि परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू राहिली. परिणामी हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. दिवसभर उष्याने हैराण झालेल्या शहरवासियांना दिलासा मिळाला. पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. रात्री आठ वाजता तुरळक पावसाचे थेंब पडू लागले. साडेआठ वाजता पावसाचे प्रमाण वाढल्याने हवेत गारवा निर्माण झाला.पावसाने फेरीवाल्यांची तारांबळ उडाली, आठवडा बाजारातील विक्रेत्यांनाही धावाधाव करावी लागली. शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार असून शेतीकामांची धांदल वाढणार आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपासून हवेत प्रचंड उष्मा होता. अनेकवेळा ४० अंश से.वर तापमान गेले. जोरदार वळीव नसल्याने मोठे, मध्यम, लघु धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. सर्व धरणात केवळ ११.४ दशलक्षघनमीटर पाणी साठा आहे. परिणामी शेतीसाठीच्या पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. राधानगरी तालुक्यातील शिंदेवाडी, पाल बुद्रुक येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीमुळे सर्वजण जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/R6NjngEA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬