[kolhapur] - चित्रनगरीत पुन्हा लाइट, कॅमेरा , अॅक्शन?

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाडेवाढीसह अन्य कारणांमुळे चित्रनगरीतील थंडावलेल्या चित्रीकरणाला पुन्हा गती लाभण्याची चिन्हे आहेत. येत्या जुलै महिन्यापासून चित्रनगरीतील भाडेवाढ कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. शिवाय दोन मोठ्या मालिका निर्मिती संस्थांनी चित्रनगरीत शूटिंगला प्राधान्य दिले आहे. यामुळे चित्रनगरीत पुन्हा एकदा 'लाइट, कॅमेरा, अॅक्शन'चा माहोल गजबजणार आहे. यानिमित्ताने चित्रनगरीतील मालिका व चित्रपटाच्या शूटिंगची कोंडी फुटणार आहे.

मराठी सिनेमाचे माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख. मात्र शालिनी आणि जयप्रभा स्टुडिओंना घरघर लागल्यानंतर कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीला उतरती कळा लागली. स्टुडिओंचे अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीला उर्जितावस्था देण्यासाठी चित्रनगरी अद्ययावत करण्याचे ठरले. राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन ३५ लोकेशन्सची निर्मिती केल्याचा दावा व्यवस्थापनाचा आहे. चित्रनगरी अद्ययावत झाली तरी गेले वर्षभर याठिकाणी मालिका व चित्रपटाचे शूटिंग झालेले नाही. चित्रनगरीत निर्माते व बड्या बॅनरना आकर्षित करुन घेण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत....

फोटो - http://v.duta.us/nBcNbwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5UWuAQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬