[kolhapur] - पहिल्याच पावसाचा तडाखा, कुठे रस्त्यावर पाणी तर कुठे वीज खंडित

  |   Kolhapurnews

मिरज, बारामती, पुणे, नगर, औरंगाबाद आणि साताऱ्यामध्ये शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. रणरणत्या उन्हामुळे शरिराची होणारी काहिली शमविण्यासाठी अनेक दिवसांपासून सर्वचजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात आहेत. अखेर शनिवारी पहाटे आणि रविवारची उकाड्याने नकोशी झालेली दुपार अचानक आलेल्या टपोऱ्या थेंबांनी अल्हाददायक झाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसलेल्या वळवाच्या पावसामुळे घरांवरची छप्परे उडाली तर झाडे उन्मळून पडली तर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मिरज पूर्व, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात शनिवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली होती. रविवारी सकाळी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

शनिवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दिवसभर आणि रविवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. मात्र, रविवारी दुपारनंतर हवेत गारवा निर्माण झाला. तालुक्यातील भोसे, कळंबी, सोनी, तानंग, सावळी परिसरात पावसाने हजेरी लावली. अधूनमधून वीजांचा कडकडाट सुरू होता. आरग-मंगसुळी या सीमाभागातील गावांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे एक मोठे झाड उन्मळून पडले....

फोटो - http://v.duta.us/-NDo0wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M_ulygAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬